यावल प्रतिनिधी
यावल तालुक्यात ग्रामपंचायत अंतर्गत सार्वजनिक स्वच्छता अभियाना अंतर्गत शौचालयाची व दलित वस्तीत झालेल्या निकृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी निळे निशान सामाजिक संघटना जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे यांनी केली आहे.
जिल्हा परिषद जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दि 16 जून 2022 रोजी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की,शासनातर्फे स्वच्छता अभियान यशस्वी होण्याकरिता लाखो रुपयांचा खर्च केला जातो परंतु ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ग्रामविस्तार अधिकारी ठेकेदार संबंधितानी सार्वजनिक शौचालयाचे निकृष्ट प्रतीचे आणि थातूरमातुर अपूर्ण कामे केले जातात ती अपूर्ण कामे पूर्ण दाखवून बिले काढण्यात आली आहेत काही कामे वर्क ऑडर येण्या अगोदर आपल्या मार्जितील कामे दाखवून कामे सुरु करण्यात आली आहे.या कामांमध्ये ग्रामसेवक बी.डी.ओ.मॅडम यांना पाच टक्के रक्कम दिली जात असल्याचा आरोप सुद्धा अशोक तायडे यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे,काही ठेकेदार तर म्हणतात कुठेही अर्ज केला तरी आमचे कोणीही काही करू शकणार नाही आमच्या पाठीशी
ग्रामसेवक व बी.डी.ओ.आहे अर्ज केला कि बी.डी.ओ साहेब म्हणता कि तुम्ही वेळोवेळी अर्ज करता तुमच्या वर खोटा गुन्हा दाखल करू आमच्या मागे मोठे मोठे लोकांचे हात आहे कोणीही काही करू शकणार नाही जे तुमच्या कडून जे होईन ते करा.
अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची चौकशी करूनन बडतर्फे करण्यात यावे किंवा बदली करावी दलित वस्ती सुधार योजनाअंतर्गत चिखली बु.खु.गावातील रस्त्यांचे कामे चालू केलेले आहे सदरचे कामे तीन इंचचे केले जात आहे निरकुष्ट दर्जाचे कामे केले जात आहे गावातील गावकरी ग्रामपंचायत मध्ये विचारना करण्यात आली कि तीन इंचाच काम का करीत आहे ग्रामसेवक रुपाली तळेले 15% ने कमिशन दिले जाते असे ठेकेदार म्हणता सर्व कामे बोगस चालू आहे जो पर्यंत चौकशी होत नाही तो पर्यंत त्यांची बिले रोखण्यात यावी गट विकास अधिकारी यांना 18/11/2021 या दिवसा पासून पत्र देण्यात आले आहे मुदतीच्या यात शौचालयाचे काम करण्यात आले नाही त्यामुळे निधी वापस करण्यात आला त्या वेळापसून तीन अधिकाऱ्यांची बदली झाली आहे तर चौथ्या अधिकाऱ्याने ते बिल पैसे घेऊन काढले अकाउंट वाले इंजिनियर विस्तार अधिकारी यांनी संगमत करून खोटे बिले काढली आहे, दहा ठेकेदार कडून 70, 70 हजार घेऊन जागतिक बँक अकाउंट वाले कडून आलेला निधीचा गैरवापर होत आहे यांच्यावर जिल्हास्तरावून कारवाई करण्यात यावी कारवाई ना झाल्यास निळे निशाण संघटना मार्फत जळगाव जिल्हात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच अप्रिय घटना घडल्यास सरकार व संबंधीत अधिकारी जबाबदार राहतील असे दिलेल्या निवेदनात अशोक तायडे यांनी म्हटले आहे.