Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»यशवंत जाधवांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच; आयकर विभागाकडून ४१ मालमत्ता जप्त
    मुंबई

    यशवंत जाधवांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच; आयकर विभागाकडून ४१ मालमत्ता जप्त

    SaimatBy SaimatApril 8, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : प्रतिनिधी 

    शिवसेनेचे उपनेते आणि मुंबई महानगरपालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव ( Yashwant Jadhav) यांच्यावर धाड टाकल्यानंतर आयकर खात्याने त्यांना आणखी एक दणका दिला. त्यांच्या ४१ संपत्ती जप्त केल्या. यात जाधव यांचा वांद्रयातील पाच कोटींचा फ्लॅटचा समावेश आहे. आयकर खात्याने २५ फेब्रुवारीला जाधव यांच्या माजगाव येथील निवासस्थानी धाड टाकली होती. तेव्हापासून तपासादरम्यान यशवंत जाधव यांच्या अनेक संपत्तींवर टाच आली आहे.

    २०१८ ते २००२ दरम्यान स्थायी समिती अध्यक्ष असताना यशवंत जाधव यांनी बेकायदा मार्गाने मिळवलेल्या पैशांच्या माध्यमातून ही संपत्ती खरेदी केली असावी असा आयकर विभागाला संशय आहे.

     

    आयकर विभागाने यशवंत जाधव यांचे मेहुणा विलाश मोहिते आणि पुतण्या विनीत जाधव यांनाही जबाब नोंदवण्यासाठी बोलावले आहे. हे दोघेही यशवंत जाधवांचे आणि त्यांच्या कंपनीचे आर्थिक व्यवहार सांभाळत होते. विलाश मोहिते आणि यशवंत जाधव यांचे पालिकेशी संबंधित आर्थिक व्यवहार पाहत असताना विनीत Newshawk Multimedia Pvt Ltd. कंपनीत वादग्रस्त व्यावसायिक बिमल अग्रवाल यांच्यासोबत संचालक होता.

    यशवंत जाधव यांनी भायखळामधील बिलाकडी चेंबर्समधील (पगडी सिस्टम असणारी इमारत) ३१ फ्लॅट्सचे भाडेकरु हक्क विकत घेतले होते. Newshawk Multimedia Pvt Ltd. कंपनीच्या नावे या भाडेकरुंना थेट रोख रक्कम देण्यात आली होती.

    जप्त करण्यात आलेल्या फ्लॅटपैकी २६ कंपनी (Newshawk Multimedia Pvt Ltd)च्या नावे नोंदले आहेत. याशिवाय, भायखळामधील ‘इम्पिरियल क्राउन हॉटेल’ यशवंत जाधव यांनी सासूच्या नावे खरेदी केले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    jalgaon : मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; जळगाव मार्गावर धावणार अतिरिक्त गाड्या

    March 22, 2026

    Railway Accident : गर्भातील बाळासाठी ८ लाखांची स्वतंत्र भरपाई, हायकोर्टचा महत्त्वपूर्ण निकाल

    March 21, 2026

    Rupali Chakankar : रूपाली चाकणकर राजीनामा महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नवीन घडामोडी

    March 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.