यावल (सुरेश पाटील)
तालुक्यातील न्हावी ग्रामपंचायत तर्फे मोर नदीवर ठेकेदारामार्फत संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू आहे ते अत्यंत निकृष्ट प्रतीचे होत आहे ते निकृष्ट प्रतीचे झालेले बांधकाम काढून उत्कृष्ट चांगल्या प्रतीचे बांधकाम करून घेण्याची मागणी यावल तालुका भीम आर्मी तर्फे करण्यात आली आणि असे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भीम आर्मी पदाधिकाऱ्यांनी दिला आला आहे.
भीम आर्मी यावल तालुकाध्यक्ष प्रवीण बाळू डांबरे व त्यांचे सहकारी पदाधिकारी सचिन पारधे,बबलू गजरे,जितेंद्र गायकवाड यांनी यावल पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे दि.25मे2022रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,न्हावी ग्रामपंचायत तर्फे15 व्या वित्त आयोगातून मोर नदीवर संरक्षण भिंतीचे बांधकाम सुरू आहे सदर बांधकाम अतिशय निकृष्ट प्रतीचे होत आहे,संबंधित ठेकेदारामार्फत सदरचे काम मंजूर इस्टिमेट प्रमाणे होत नसल्याने ठेकेदारांची मनमानी सुरू आहे या कामाकडे पंचायत समिती बांधकाम अभियंता यांनी आपले लक्ष केंद्रित करून ठेकेदाराकडून मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे काम करून घ्यावे व केलेल्या कार्यवाहीची माहिती कळवावी आणि असे न झाल्यास यावल तालुका भीम आर्मी तर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा तालुका अध्यक्ष प्रवीण डांबरे आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना दिला आला आहे.