धरणगाव : जिल्हा प्रतिनिधी
येथील विवेकानंद पंतसंस्थेचे तसेच स्वप्निल मेडीकल चे संचालक सुधाकर शेठ वाणी व स्वामी समर्थ ट्रेडर्स चे संचालक किशोर शेठ वाणी यांचे वडील कै नामदेव महादु येवले यांचा प्रथम पुण्यस्मरण निमित्त येथील वाणी समाज कार्यालयात भव्य मोफत नेत्र तपासणी शिबीराचा कार्यक्रम संपन्न झाला त्यात शहर व परिसरातील 240 नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली.
त्या प्रसंगी प्रारंभी प्रमुख अतिथी चा हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले प्रसंगी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेकानंद पंतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष ॲड भोलाणे बापु होते तर प्रमुख अतिथी म्हणुन नेत्रतज्ञ डॉ आम्रपाली चेतन काकलीया, जळगाव, उमविचे सिनेट सदस्य दिलीपदादा पाटील, प.रा.विद्यालय चे सचिव डॉ मिलिंद डहाळे, विवेकानंद पंतसंस्थेचे चेअरमन तथा जेष्ठ पत्रकार कडू महाजन, डॉ प्रशांत भावे, डॉ रमेश पाटील,ध. न. पा. गट नेते कैलास माळी सर, चर्मकार महासंघाचे समाजाचे राष्ट्रीय नेते भानुदास आप्पा विसावे,लाड शाखीय वाणी समाजाचे अध्यक्ष विलासनाना येवले, नगरसेवक ललित येवले, जिवनआप्पा
बयस,केमिस्ट ॲसोशियन चे तालुका अध्यक्ष मनिष लाड, ॲसोशियन चे तालुका सचिव अध्यक्ष छोटु जाधव, डॉ पंकज अमृतकर, डॉ मनोज अमृतकर, व्यंकटेश नागरी सह पंतसंस्थेचे चेअरमन प्रशांत केले आदि मान्यवर उपस्थित होते
प्रारंभी आयोजकांचा वतीने प्रमुख पाहुण्याचा सत्कार करण्यात आला
त्या प्रसंगी डि आर पाटील सर, डॉ मिलिंद डहाळे,यांनी स्वर्गीय नामदेव सेठ येवले यांनी समाज जिवनात राबविलेल्या विविध सामाजिक व विधायक कार्याची महती सागीतली नेत्र तपासणी हा स्तुत्य उपक्रम असल्याचे नमुद करून भविष्यात नेत्रदान हे एक श्रेष्ठ दान असल्याचे सांगुन समाजाने नेत्रदानाचा कार्यक्रमाला देखील चालना द्यावी व त्यात देखील सहभागी होण्याचे आवाहन केले शेवटी ॲड भोलाणे बापु यांनी आपल्या अध्यक्षिय भाषाणात येवले परीवाराचे कौतुक करून पंतसंस्थेचा वतीने उपस्थित सर्व समाजबांधवाचा वतीने श्रंध्दाजली वाहीली
सदर ह्या कार्यक्रमात रा स्व संघाचे पच्श्रिम क्षेत्र प्रमुख बाळासाहेब चौधरी यांनी देखील भेट देऊन कार्यक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रम यशस्वी साठी लाड शाखीय वाणी समाज मंडळ स्वामी विवेकानंद नागरी पंतसंस्था,व्यंकटेश नागरी सहकारी पंतसंस्था, केमिस्ट परीवार, यांनी परीश्रम घेतले कार्यक्रमचे आभार व सुत्रसंचालन चंद्रशेखर मुसळे यांनी केले, प्रसंगी असंख्य नागरीक उपस्थित होते