गोंदीया :वृत्तसंस्था
ज्यांना मुलंबाळं नाही अशा लोकांना त्यांच्या वेदना कळणार नाहीत अशी टीका काँग्रेस प्रदेशाशध्यक्ष नाना पटोले यांनी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती केली आहे. युक्रेनमध्ये अजूनही मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी अडकून आहेत. मी स्वतः त्या विद्यार्थ्यांशी फोनवर बोललो त्यांचे व्हिडियो पाहिले भारताच्या विदेश मंत्रालयाशीही मी अनेकदा बोललो असून त्यांच्याकडून कोणतेही प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
तसंच ज्या प्रमाणे कोरोनामध्ये (Corona) पाच राज्याच्या निवडणूका दुसऱ्या लाटेत आल्या, त्यावेळी भारताचे पंतप्रधान प्रचारात व्यस्त होते, आणि दुसरीकडे कोरोनामुळे गंगानदीत प्रेतं तरंगतांना दिसली तेव्हा त्यांना जाग आली. त्याचप्रमाणे आताही पाच राज्याचे निवडणुका (Election) सुरु झाल्या आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु होणार असल्याचं रशियाच्या माध्यमातून अल्टिमेट दिले जात होते. तेव्हा देखील भारताचे प्रधानसेवक नरेंद्र मोदी (Narendra Modi) निवडणुकीत व्यस्त होते अशी टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाआधीच (Russia-Ukraine War) बाकीच्या देशांतील विद्य्यार्थाना त्यांच्या देशात घेऊन जाण्याची सोय केली. मात्र, आपल्या देशातून कुठली मदत देशातील युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्य्यार्थाना मिळालेली नाही, शिवाय आपल्या देशातील केंद्रीय दुतावास सुद्धा तेथील विद्य्यार्थाचा फोन उचलत नाहीत विद्यार्थ्यांचे ऐकायला तयार नाहीत आणि केंद्र सरकार म्हणते तुम्ही काही गडबड करू नका आम्ही सगळं बघून घेऊ.
मात्र आज ज्यांचे मुलं त्याठिकाणी शिकत आहेत त्यांच्या कुटूंबियांवर काय वेदना होत असतील ज्यांना मुलं बाळ नाही त्यांना काय ते कळणार नाही. केंद्रातील सरकार आपल्या देशातील लोकं युक्रेनमधून आणण्यात कमी पडल्यचे नाना पटोले यांनी म्हटले. तसंच जी मुलं बंकरखाली आहेत. त्या ठिकाणाचे मुलींचे व्हिडीओ पाहिले तर तेथून मुली गायब होत आहेत .हे सगळं बघून देशाचे पंतप्रधान जागे व्हावेत. सगळ्या मुलांना देशात परत आणले पाहिजे अशी सदबुद्धी त्यांना मिळो अशी आशा मी करीत असल्याचे नाना पाटोले म्हणाले.
