जळगाव ः प्रतिनिधी
मेहरूण येथील साई मंदिराच्या प्रांगणात 20 लाख रुपये खर्चून बसविण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉक या विकास कामाचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते झाले.
मेहरूणमध्ये मनपाच्या खुल्या जागेत पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. या कामासाठी आमदार निधीतून 20 लाख रुपये दिले.जनतेच्या भल्यासाठी यापुढेही आमदार निधी उपलब्ध करून देऊ, असे आमदार भोळे यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर जयश्रीताई महाजन, विरोधी पक्षनेते डॉ. सुनिल महाजन, उद्योजक चंद्रकांत लाडवंजारी, नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य प्रशांत नाईक यांच्यासह शिवसेना महिला आघाडीच्या शोभा चौधरी, मक्तेदार गौरव पाटील, बंडू वाणी उपस्थित होते.