जळगाव : प्रतिनिधी
शहरापासून जवळ असलेल्या शिरसोली येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या संशयावरून एका व्यक्तीला नागरिकांनी मारहाण केल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. या प्रकरणी ‘त्या’ व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली.अल्पवयीन मुलीने नातेवाइकांना ‘त्या’ व्यक्तीची माहिती दिल्यानंतर नातेवाईक संतप्त झाले. त्यानंतर रात्री येथे त्या व्यक्तीला नातेवाइकांसह नागरिकांनी पकडून चोप दिला. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला होता. वेळीच पोलीसपाटील शरद पाटील यांनी मोठ्या जिकिरीने त्या व्यक्तीला जमावातून कसेबसे वाचवून औद्योगिक पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
