पारोळा : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात ६ वर्षीय मुलगा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २६ मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास गावातील देवळात मुलगा दर्शनासाठी गेला होता. त्यासोबत एक १५ वर्षीय व १६ वर्षीय असे दोन अल्पवयीन मुले देखील सोबत होते. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या पाठीमागे दोन्ही अल्पवयीन मुलांनी सहा वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केला असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार पीडित मुलाच्या नातेवाईकाने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतला होता.
दरम्यान, हा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ मुलाच्या नातेवाईकांनी बघितला असता त्यांना धक्काच बसला. त्यांनी तातडीने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेऊन दोन्ही अल्पवयीन मुलांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहेत.