मुदस्सर नज़र युवा मंच तर्फे ई श्रम नांव नोंदणी शिबिर उत्साहात

0
38

फैजपूर:प्रतिनिधी
येथील हजीरा मोहल्ला येथे मुदस्सर नज़र युवा मंच तर्फे आयोजित ई श्रम योजना मोफत नांव नोंदणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन अब्दुल करीम सालार यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, मुदस्सर नज़र युवा मंचचे उपक्रम स्तुत्य आहे.  समाजासाठी लोकहिताचे कार्य करून दाखवण्याची एक उत्तम संधी असते.
यावेळी व्यासपीठावर डॉ. अब्दुल जलिल शेख, जफर मेंबर, शेख कुरबान, कलिम मेंबर, आसीफ मॅकेनिक, मारूळ चे सरपंच असद अहमद, आर क्यु शेख उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन आसीफ मॅकेनिक व मुदस्सर नज़र यांनी केले होते.
रहीम मलक वाहेद, मलक कलिम मिस्त्री, वसीम इकबाल, अजिम बुरहान ,अल्ताफ खान, फारूक खान, वसीम जनाब, फारुक जनाब, कामील खान, जावीद हकीम, सलिम उस्मान उपस्थित होते.
जाविद जनाब,  मतिऊर रहमान, कांचन फालक, शेख आसीफ, मुस्लिम मेकॅनिक, खिदमते मिल्लत फाऊंडेशन यांनी सहकार्य केले.
सुत्रसंचलन मुजम्मील काजी यांनी तर आभार फारुक जनाब यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here