मुख्यमंत्र्यांबद्दल महाराष्ट्र सैनिकांना तिळमात्र सहानुभूती नाही – खोपकर

0
31

मुंबई : वृत्तसंस्था

राज्याचे मंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर बहुमत गमावलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्तिपरीक्षेला सामोरे जाण्यापूर्वी बुधवारी रोजी राजीनामा दिला. महाविकास आघाडी सरकार कोसळले. यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी “मुख्यमंत्र्यांबद्दल मनसेच्या कार्यकर्त्यांना तिळमात्र सहानुभूती नाही” असा संताप व्यक्त केला.

काल रात्री साडेअकराच्या सुमारास अमेय खोपकर यांनी ट्विटरवरुन एक स्क्रीनशॉर्ट शेअर करत प्रतिक्रिया नोंदवली. खोपकर म्हणालेत “प्रत्येक प्रसंगात राज ठाकरेंचे नुकसान करणाऱ्या, राज ठाकरेंची माणसं फोडणाऱ्या, राज ठाकरेंबद्दल सतत द्वेषाचे राजकारण करणाऱ्या उद्धव ठाकरेंबद्दल आम्हाला मनसेचा महाराष्ट्र सैनिक म्हणून तिळमात्र सहानुभूती नाही.”

बहुमत चाचणीसाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना बुधवारी फोन करुन पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती. त्यावर राज यांनी भाजपाच्या बाजूने मनसेचा आमदार मतदान करेल, असं फडणवीसांना सांगितले होते. मात्र, बहुमत चाचणीच्या आधीच उद्धव यांनी राजीनामा दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here