जळगाव ः प्रतिनिधी
गेल्या 60 तासात खूप मोठा राजकीय भूकंप राज्यात झाला आहे. त्याच पार्श्वभूमिवर शिवसेना पक्षपमुख उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जळगाव जिल्ह्यातील शिवसैनिक एकत्र येवून शहरातील गोलाणी मार्केट पक्ष कार्यालयापासून ते टॉवर चौकापर्यंत समर्थनार्थ रॅली काढण्यात आली होती. यावेळी शिवसैनिकांनी उध्दव ठाकरे यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. शिवसेनेतील प्रत्येक नेत्यांनी बंडखोर शिंदेना स्वगृही परत येण्याची भावनिक साद घातली जात आहे.
जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात आली. यावेळी शिवसेनेचे नेते गुलाबराव वाघ, महानगराध्यक्ष शरद तायडे, महापौर जयश्रीताई महाजन, गजानन मालपुरे, सरिताताई माळी, शोभा चौधरी, नितीन सपके, नगरसेवक सचिन पाटील मानसिंग सोनवणे, प्रशांत सुरळकर, मंगला बारी, शिवराज पाटील यांच्यासह शिवसेनेचे जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.