मुक्ताईनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती उत्साहात साजरी

0
24
मुक्ताईनगर : प्रतिनिधी 
मुक्ताईनगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नेहमीपेक्षा व्दिगुणित उत्साहात पार पडणार असून , त्यामुळे यंदा बाबासाहेबांच्या अनुयायांचा उत्साह वाढणार आहे. गुरुवार १४ एप्रिल रोजी होणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त मुक्ताईनगर  येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून जयंती उत्सव समितीतर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. जयंती दिनी सकाळ पासूनच प्रवर्तन चौकातील शाहू – फुले- डॉ आंबेडकर महापुरुषांच्या स्मारकांना माल्यार्पण व अभिवादन करण्यात येत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांतभाऊ पाटील यांच्या सौभाग्यवती सौ. यामिनीताई चंद्रकांत पाटील यांच्या सह शिवसेना पदाधिकऱ्यांनीही महापुरुषांच्या स्मारकांना माल्यार्पण करून अभिवादन केले.
    प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई,  अल्पसंख्यांक जिल्हा संघटक अफसर खान, महिला आघाडी शहर संघटिका सरिताताई कोळी, जयंती उत्सव समिती अध्यक्ष सुनील बोदडे, सुधाकर बोदडे, शिवसेना शहर प्रमुख गणेश टोंगे, शहरप्रमुख तथा गटनेता राजेंद्र हिवराळे, गटनेता निलेश शिरसाट, नगरसेक तथा पाणीपुरवठा सभापती मुकेशचंद्र वानखेडे, नगरसेवक बांधकाम सभापती संतोष मराठे, नगरसेविका सौ सविताताई भलभले , बाळा भालशंकर ,रवींद दांडगे, निलेश घोरपडे , स्वीय सहायक प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील , रितेश सोनार आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here