मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा येथील शेकडो महिलांनी  बांधले हातावर शिवबंधन ! राष्ट्रवादीला मोठा धक्का

0
42
मुक्ताईनगर : प्रतिनिधी 
हरताळा ता. मुक्ताईनगर येथील शेकडो महिलांनी दि.१६ मे २०२२ सोमवार रोजी राष्ट्रवादीला राम राम ठोकत शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार पाटील व शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी सर्व प्रवेश करणाऱ्या महिलांना शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश करून घेतला. आमदार चंद्रकांत पाटील यांनी माजी मंत्री एकनाथ खडसेंना दिवसभरात दिलेला हा दुसरा धक्का असल्याचे बोलले जात असून तत्पूर्वी सकाळी सूळे – रिगाव च्या महिला सरपंच व अन्य ग्रा. पं सदस्यांनी शिवसेनेत प्रवेश घेतल्याने आगामी जिल्हा परीषद व पंचायत समिति निवडणुकीच्या पार्श्वूमीवर शिवसेनेत झालेली इंकमिंग ही जोरदार झाल्याचे सर्वत्र बोलले जात आहे.
    प्रसंगी आमदार चंद्रकांत पाटील यांचेसह शिवसेना तालुका प्रमूख छोटू भोई, उपतालुकाप्रमुख जीवराम कोळी,  युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, अल्पसंख्याक जिल्हा संघटक अफसर खान, महील आघाडी उपजिल्हा  संघटीका सुषमाताई शिरसाट, उप शहर संघटीका यशोदाताई माळी, शाखा संघटिका ज्योतीताई माळी , भावनाताई गायकवाड आदींसह हरताळा येथील सोपान तायडे, जयचंद्र सोनवणे, सुनील कोळी, वाजीद मणियार, सचिन लांडगे, वनिल कोळी, जितेंद्र वाघ, गजानन हागे, गणेश कचरे आदींची उपस्थीती होती.
यांनी घेतला प्रवेश :
सीमाताई पुजारी, मानसीताई पुजारी, रंजनाताई पुजारी, ममताताई पुजारी, गीताताई उबाळे, किरणताई पुजारी, छायाताई पुजारी, शुभांगीताई पुजारी, सुनंदाताई पुजारी, यमुनाबाई उबाळे, उज्वलाताई निकम, सुभद्राबाई अवसरमोल, प्रमिलाबाई त्यागी, नंदाबाई सोनवणे, कल्पनाताई पानपाटील, सीताबाई साळुंखे, सुरेखाताई सुरळकर, अनिताताई साळुंके, पुष्पाताई पवार सुनीताताई साळुंके, सुलभाताई तायडे, शकुंतलाताई सुरवाडे, प्रमिलाताई निकम, ज्योतीताई निकम, विमलताई  साळुंखे, मिनाबाई साळुंके, सुशीलाताई अढायके सुनिताताई इंगळे, पुष्‍पाबाई पवार यांच्यासह शेकडो महील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहिर प्रवेश केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here