मुकुंद सपकाळे यांचा महात्मा फुले समता पुरस्कार देऊन सन्मान

0
37

जळगाव  : प्रतिनिधी: सर्वसामान्य वंचित समुहांच्या न्याय हक्कासाठी लढणारे आंबेडकरी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते मुकुंद सपकाळे यांना महात्मा फुले समता शिक्षक परिषदेने महात्मा फुले समता पुरस्कार देऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील अल्पबचत भवन सभागृहात पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षणाधिकारी विकास पाटील,महात्मा फुले समता शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष भरत शिरसाठ, डायट चे प्राचार्य डॉ. अनिल झोपे,सिव्हील राईट प्रोटेक्शन् सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद जीवने,  शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण,रविकिरण बिऱ्हाडे,डॉ.सत्यजित साळवे,विश्वास पाटील,शैलेश दखणे, खलिल शेख,मुकुंद नन्नवरे,अनिल सुरळकर  आदी  उपस्थित होते. म.फुले समता परिषदेचे राज्याध्यक्ष भरत शिरसाठ यांनी प्रास्ताविक करताना सत्यशोधक विचारांवर चालणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्याचा संघटनेचा उद्देश स्पष्ट केला.
पुरस्कार्थी मुकुंद सपकाळे मागील चार दशकांपासून शोषित वंचित घटकांसाठी आवाज उठवत
असून विद्यार्थी दशेपासुनच आंबेडकरी विचारांच्या मार्गावर चालत अनेक आंदोलनातून सामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लढत आहेत. त्यांना मिळालेला पुरस्कार हा लढाऊ योध्याचा खरा सन्मान असल्याची भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.  सूत्रसंचालन  रावलाणी यांनी तर आभार रणजित सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हाभरातून मोठ्या संख्येने शिक्षकांची उपस्थिती होती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here