मुंबई : प्रतिनिधी:
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. आता मुंबईतील शाळा दोन मार्चपासून पूर्ण क्षमतेने सुरु होणार आहेत. पहिली ते बारावीचे वर्ग पूर्णवेळ भरणार असल्याची माहिती मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. शाळा, महाविद्यालयामध्ये मास्कच वापरणे बंधनकारक असणार आहे. शाळेत खेळही सुरु राहतील, आदित्य म्हणाले.
मुंबईतील कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी पूर्णवेळ शाळा सुरु करण्याचा घेतला आहे. विशेष व दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळा व मैदानी खेळ, विविध शैक्षणिक उपक्रम सुरू करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
