
जळगाव ः प्रतिनिधी
विधान परिषद निवडणुकीत भाजपाने पंकजा मुंडे यांना डावलल्याने मुंडे समर्थक संतप्त झाले आहेत. विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीच मुंडे यांना डावलल्याचा आरोप करत निषेध करण्यात आला. वंजारी समाजाच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर टरबूज फोडून भाजप नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाकडून पाच जागांकरिता उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यात माजी मंत्री पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याने वंजारी समाजाचे कार्यकर्ते ईश्वर पाटील, अनिल घुगे, गजानन वंजारी, रितेश लाडवंजारी, योगेश नाईक, राहुल सानप, शेखर लाडवंजारी, महेश घुगे, तेजस वाघ, विशाल घुगे, अभिजीत घुगे, गौरव वाघ, किरण नाईक, वैभव वाघ, ऋषिकेश वाघ, आकाश पाटील, मयूर पाटील, नरेंद्र नाईक आदींनी आंदोलन केले.


