मी पक्षबिक्ष मानत नाही, महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय कुस्त्या अगदीच चिल्लर : उदयनराजे

0
6

राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानप्रक्रिया सुरु असेल. त्यानंतर मतमोजणीला सुरुवात होईल. आपल्याला लोकांनी निवडून दिलं आहे. सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्रातील लोकांचे संरक्षण करायला पाहिजे. मात्र, सध्या तसे होताना दिसत नाही. सध्या राजकारणात सुरु असलेल्या कुस्त्या या अगदी चिल्लर आहेत, असे उदयनराजे यांनी म्हटले.
आज राजेशाही नाही, लोकशाही आहे या लोकशाहीत तुम्ही राजे आहात, लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार कोणत्याही पक्षातील असू द्या

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने सुरु असलेल्या राजकारणावर भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी भाष्य केले आहे. सध्या राज्यात कोणत्या कुस्त्या चालल्या आहेत, हे कळत नाही. मात्र, या कुस्त्या चिल्लर आहेत, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले. ते साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या बुलेट वितरण सोहळ्यात बोलत होते.
दररोज गेट स्लिम ज्यूस प्यायल्यामुळे दहा किलोहून अधिक वजन कमी होणार

यावेळी उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकारणावर सडकून टीका केली. आज राजेशाही नाही, लोकशाही आहे. या लोकशाहीत तुम्ही राजे आहात. मात्र, लोकांनी निवडून दिलेले आमदार, खासदार कोणत्याही पक्षातील असू द्या. पक्षबिक्ष आपण मानत नाही, असे उदयनराजे यांनी सांगितले. जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी थोडा विचार करायला पाहिजे. आपल्याला लोकांनी निवडून दिलं आहे. सांस्कृतिक तसेच क्रीडा क्षेत्रातील लोकांचे संरक्षण करायला पाहिजे. मात्र, सध्या तसे होताना दिसत नाही. सध्या राजकारणात सुरु असलेल्या कुस्त्या या अगदी चिल्लर आहेत, असे उदयनराजे यांनी म्हटले.

खऱ्या कुस्त्या तर मातीतल्या आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक स्कीम आहेत. या माध्यमातून कुस्तीपटू आणि खेळाडुंना नक्की फायदा करुन देईन. मगाशी माझा उल्लेख कोणीतरी ट्रिपल केसरी म्हणून केला, त्यांच्या मनात काय होतं हे मला माहिती नाही. पण माझं वय काय एवढं झालेलं नाही, ट्रिपल करण्यासारखं, असे उदयनराजे यांनी म्हटले. याच कार्यक्रमात उदयनराजे यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. कोण संजय राऊत त्यांना मी ओळखत नाही. यापुढे राजघराण्यावर बोलाल तर, आम्ही बांगड्या भरल्या नाहीत, जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा उदयनराजे यांनी संजय राऊत यांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here