Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»धुळे»मिशन आयसीयू धुळे अत्याधुनिक आयसीयू बेड सुविधा सुरू करणार
    धुळे

    मिशन आयसीयू धुळे अत्याधुनिक आयसीयू बेड सुविधा सुरू करणार

    saimat teamBy saimat teamJanuary 28, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    धुळे: मिशन आयसीयू ने महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात जिल्हा रुग्णालयांच्या महत्त्वाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी 10 खाटांचा आयसीयू सेटअप सुरू करण्याची घोषणा केली आहे. येऊ घातलेल्या तिसर्‍या लाटेमध्ये मदतीची नितांत गरज असलेल्या रुग्णालयांमधील आयसीयू   च्या  पायाभूत सुविधांना बळ देण्याच्या दिशेने हा उपक्रम म्हणजे  एक पाऊल आहे.

    या नवीन उपक्रमाविषयी बोलताना, मिशन आयसीयू चे सह-संस्थापक श्री मनोज शाह म्हणाले, “सार्वजनिक रुग्णालयांना अत्याधुनिक आयसीयू   बेड सुविधांनी सुसज्ज करून कोव्हीड  पलीकडे टिकणारी शाश्वत प्रभावी व्यवस्था  निर्माण करणे हे आमचे उद्दिष्ट आहे. आमच्या संस्थेच्या केंद्रस्थानी असलेल्या मजबूत पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीसह, मिशन आयसीयू   आधीच देशभरात 60 आयसीयू   बेड स्थापित करण्यात यशस्वी झाले आहे. धुळे आणि इतर तीन जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करून आम्ही यावेळी आमचे कार्य आणखी वाढवत आहोत, जेणेकरून आधीच ताण असलेल्या रुग्णालयांसाठी तिसरी लाट अधिक गंभीर होऊ नये.”

    महाराष्ट्रातील सुमारे 10 जिल्ह्यांमधील वैद्यकीय पायाभूत सुविधांच्या स्थितीचा तपशीलवार अभ्यास केल्यानंतर हे स्थान निवडण्यात आले. सर्व जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयांची स्थिती समजून घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक/सिव्हिल सर्जन यांना एक योग्य फॉर्म पाठवण्यात आला होता, त्या आधारे  धुळे आणि इतर तीन जिल्हे मदत मिळण्यास सर्वाधिक पात्र असल्याचे आढळले. मिशन आयसीयू   धुळे, बुलढाणा, नांदेड येथील जिल्हा रुग्णालयांना आणि सांगली उपजिल्हा रुग्णालयाला  मदत करेल. उपजिल्हा रुग्णालये त्यांच्या कमी दृश्यमानतेमुळे बाहेरून सहाय्य मिळविण्यात अनेकदा अयशस्वी ठरतात. मिशन आयसीयू   या उपक्रमाद्वारे ही दरी भरून काढण्याचे उद्दिष्ट ठेवते.

    दुसरीकडे, धुळे जिल्हा रूग्णालयाची एकूण क्षमता १०० खाटांची असून त्यापैकी फक्त २० खाटांना आयसीयू   बेड म्हणून नियुक्त केले आहे. हॉस्पिटलने DCHC निकषांनुसार कोव्हीड  दरम्यान रूग्ण हाताळल्याचा अहवाल देण्यात आला. रुग्णसंख्येच्या दरांमध्ये होणारी कोणतीही अनपेक्षित वाढ हाताळण्यासाठी तिसऱ्या लाटेच्या संकटादरम्यान हॉस्पिटलमध्ये अधिक बेड असणे महत्त्वाचे आहे. सर्वेक्षणादरम्यान गोळा केलेल्या आकडेवारीनुसार या जिल्हा रुग्णालयात एकूण सात अतिदक्षता, भूलतज्ज्ञ आणि फिजिशियन आहेत.

    धुळ्यातील आयसीयू   च्या पायाभूत सुविधांच्या गरजेविषयी बोलताना  जिल्हा रुग्णालय धुळे चे सिव्हिल सर्जन डॉ. संजय शिंदे,म्हणाले, “या साथीच्या आजारामध्ये आमच्या लक्षात आले की टियर 2 शहरांमध्ये संसाधनांच्या कमतरतेमुळे प्रत्येकजण गंभीर सेवांसाठी मेट्रो शहराकडे धाव घेत होता.  आतापर्यंत, आमच्याकडे धुळे जिल्ह्यात फक्त एक शासकीय आयसीयू   बॅक-अप सेट होता जो शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहे आणि ते शहरापासून सुमारे 7 किमी अंतरावर आहे. मिशन आयसीयू   च्या अभिनव उपक्रमाबद्दल आम्ही आपले आभार मानतो कारण सर्वोत्तम गुणवत्ता आणि मानकांची आयसीयू   उपकरणे आता शहराच्या मध्यभागी, गरजूंना उपलब्ध होतील”.

    महाराष्ट्रातील 4 जिल्ह्यांमध्ये आयसीयू   बेड बसवण्याचा एकूण खर्च सुमारे 1.6 कोटी इतका असेल ज्याला क्रिप्टो रिलीफ

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Taloda:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तळोदा महाविद्यालयात अभिवादन

    January 3, 2026

    Navapur:“नवापूर नगराध्यक्षांचे दालन नागरिकांसाठी सदैव खुले; नवापूरमध्ये लोकशाही संवादाला नवे बळ”

    January 3, 2026

    Dhule:भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण फुंकणार रविवारी प्रचाराचे रणशिंग

    January 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.