मास्क आणि लसीपासून सुटका; युरोपातील देशांनी घेतला निर्णय

0
30

स्पेन : वृत्तसंस्था I जगात अनेक देशांमध्ये कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांमध्ये मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. मात्र युरोपातील देशांमध्ये मास्क आणि लस घेण्याच्या अनिवार्यतेला हटवण्यात येण्याची शक्यता आहे. नुकतेच स्पेन सरकारने कोरोनाला सामान्य फ्लू मानले आहे.

केवळ मास्कच नाही, तर सरकार कोरोना लस घेण्याच्या अनिवार्यतेला हटवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. सरकारच्या म्हणण्याप्रमाणे, कोरोनाचा केवळ ओमायक्रॉन व्हेरिएंट महामारीला शेवटच्या उंबरठ्यावर घेऊन जाईल. आणि आता या प्रक्रियेला सुरू झालीये.

तज्ञांच्या माहितीप्रमाणे, ओमायक्रॉन प्रकाराचा संसर्ग झाल्यास रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता खूपच कमी आहे. यासोबतच मृतांचा आकडाही कमी नोंदवला जातोय. अशा परिस्थितीत स्पेनचे पंतप्रधान प्राडो सांचेझ यांनी साथीच्या काळात लादलेले निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतलाय.

याशिवाय अनेक देशांनी क्वारंटाइन कालावधी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.यासोबतच अत्यावश्‍्यक सेवांवर कोणतीही बंधन घालण्यात आलेली नाही. चेक रिपब्लिकने अलीकडेच आयसोलेशनचा कालावधी दोन आठवड्यांवरून केवळ 5 दिवसांवर आणला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here