Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»मास्कसक्तीचा निर्णय इतक्यात नाही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा खुलासा आषाढ वारी होणार : राजेश टोपे
    मुंबई

    मास्कसक्तीचा निर्णय इतक्यात नाही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा खुलासा आषाढ वारी होणार : राजेश टोपे

    SaimatBy SaimatJune 6, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई –  प्रतिनिधी
    राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा एकदा वाढायला लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.७) मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माध्यमांशी बोलताना माहिती दिली. यावेळी मास्कसक्तीबाबत सध्या कुठलाही निर्णय झाला नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

    त्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, कोविडबाबत प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागामार्फत आपण संपूर्ण माहिती देतो. नेहमीप्रमाणं आजही याचं प्रेझेंटेशन झालं. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पॉझिटिव्हीटी वाढल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळं चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना आज कडक पद्धतीनं देण्यात आल्या आहेत.

    पॉझिटिव्हीटी रेट सहा जिल्ह्यांमध्ये खूपच जास्त झाला आहे. ८ टक्के, ६ टक्के असा या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्ही रेट आहे, ही या जिल्ह्यांपुरतीच सध्या वस्तुस्थिती आहे. पण यांमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १ टक्के रुग्णांना रुग्णालयांमध्ये अॅडमिट करावं लागत आहे. पण यामध्ये गंभीरतेचं प्रमाण कुठेही नाही. त्यामुळं तसा काळजीचा विषय आजिबात नाही, असंही टोपे म्हणाले. मास्कची सक्ती नसली तरी आवाहन केलं आहे की, त्याची अंमलबजावणी व्हावी, असे ते म्हणाले.

    वारी होणार :
    आषाढी वारी संदर्भातही चर्चा झाली. वारीमध्ये दहा-पंधरा लाख लोक एकत्र येणार आहेत, असा परिस्थितीत काळजी घेऊन ही वारी पूर्ण करावी अशी प्रामुख्यानं चर्चा झाली आहे. वारीची तयारी पुढे गेलेली आहे. यामागे लोकांच्या भावना आहेत, त्यामुळं वारी होईल यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही, असंही यावेळी राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    SC Holiday Verdict : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय: धार्मिक सणासाठी सार्वजनिक सुट्टीची मागणी करता येणार नाही

    March 26, 2026

    Narendra Modi On War : पश्चिम आशियातील युद्धावर भारताची संतुलित भूमिका; लोकसभेत पंतप्रधान मोदींचे स्पष्ट विधान

    March 23, 2026

    Air India flights cancelled : इराण संघर्षामुळे एअर इंडियाचे २,५०० उड्डाणे रद्द; विमान कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढला

    March 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.