बोदवड ः प्रतिनिधी
संत सावता माळी नवयुवक मंडळाच्या सदस्यांनी येथील विश्रामगृहात आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली. समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन देताना सभामंडपासाठी निधी देण्याची मागणी केली. लवकरच हा निधी मंजूर करुन आणू असे आश्वासन मिळाले.
सांस्कृतिक तसेच लग्न समारंभासाठी बिन शेती गट नंबर 418 मध्ये ग्रामपंचायतीमार्फत जागा मिळालेली आहे.
मात्र, ही जागा मोकळी असल्याने तेथे विविध कार्यक्रम होण्यासाठी बंदिस्त सभामंडप आवश्यक आहे. त्यासाठी निधी उपलब्ध मिळावा, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक दिनेश माळी, नगरसेवक नीलेश माळी, आबा माळी, रामधन माळी, विलास माळी, अनिल माळी, अजय माळी, सागर माळी, किशोर माळी, सुरेश माळी, युवराज माळी, अशोक माळी, अशोक माळी, संजय माळी, भगवान माळी, विजय माळी, गजानन माळी, संजय माळी, विनोद माळी, अजय पाटील, संदिप माळी, गजानन घाटे, सोना माळी, सुनिल माळी, गजानन रोकडे यांनी केली.
