जळगाव ः प्रतिनिधी
नवीन आर्थिक वर्षात एप्रिलच्या 18 दिवसांत 11 कोटी रूपयांचा भरणा झाला आहे. नागरीकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता महापौर जयश्री महाजन यांनी केलेल्या सुचनेनुसार 10 टक्के सुट देण्याची योजना 31 मेपर्यंत वाढवण्यात आली.
एप्रिल महिन्यात 12 तारखेपासून करात सुट देण्यास सुरूवात केली होती. संपूर्ण महिनाभरात 11 कोटींचा भरणा झाला आहे. गेल्या वर्षी एप्रिल 2021 मध्ये अवघे साडेतीन कोटी रूपये भरणा झाला होता.
त्यामुळे यंदा तीनपट भरणा वाढला आहे. नागरीकांची वाढती गर्दी लक्षात घेता महापौर जयश्रीताई महाजन यांनी 10 टक्के सुट देण्यासाठी मुदत वाढवून देण्याची सुचना केली होती. त्यानुसार उपायुक्त प्रशांत पाटील यांनी 31 मेपर्यंत 10 टक्के सुट योजना जाहीर केली आहे.



