चोपडा : प्रतिनिधी
तालुक्यातील मालखेडा येथील मुलचंद तापीराम पाटील (७०) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे तापी पुलावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. मुलचंद तापीराम पाटील या वयोवृद्ध शेतकऱ्यावर कर्ज होते, नापिकी व कमी उत्पादन यामुळे त्यांच्या वर ३ ते ४ लाखांचे कर्ज डोक्यावर होते. कर्ज कसे फिटेल ? या विवंचनेत असल्याने ते दोन दिवसांपासून गायब होते.त्यांचा शोध घेतला असता आज दि.९रोजी त्यांचे शव पाथरडे शिवारात तापी नदी क्षेत्रात पाण्यावर तरंगताना आढळून आले यावेळी जागेवर पंचनामा करून दहन करण्यात आले.यावेळी माजी सरपंच प्रशांत पाटील, लिलाचंद पाटील, ज्ञानेश्वर पाटील आदीं उपस्थित होते.