जळगाव : प्रतिनिधी
बॅंकेत जमा करण्यासाठी दिलेले दिड लाख रुपये घेऊन फरार झालेल्या नोकराविरुद्ध हॉटेल मालकाने एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. अजिंठा चौफुली परिसरातील रिलायन्स पेट्रोल पंपानजीक “हॉटेल लायबा”चे मालक इकबाल मन्सुरी यांचा मुलगा वकार इकबाल मन्सुरी यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे. मोहम्मद आशान अन्सारी रा. गाजीपूर – बिहार असे फरार झालेल्या नोकराचे नाव आहे.
हॉटेल लायबा येथे मोहम्मद आशान अन्सारी हा गेल्या सहा वर्षापासून कॅप्टन म्हणून काम करत होता. हॉटेलमधे मालाची डीलीव्हरी आणि बॅंकेत रोख रक्कम जमा करण्याचे कामदेखील तो करत होता. 18 फेब्रुवारी रोजी त्याला आयसीआयसीआय बॅंकेत दिड लाख रुपये जमा करण्यासाठी पाठवण्यात आले होते. तेव्हापासून तो गायब झाला असून त्याचा फोन बंद येत आहे. हॉटेलमधील इतर नोकरांकडून देखील त्याने सुमारे 92 हजार रुपये घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.