मुंबई : मुंबईतील १ हजार ३९ कोटींच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत यांची चौकशी होऊन त्यांना अटक करण्यात आली होती. त्यासंदर्भात करण्यात आलेल्या तपासात या घोटाळ्यातील पैसा अलिबागमधील मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरण्यात आल्याचा ईडीला संशय आहे. यासंदर्भातील चौकशीसाठी राऊत यांना ईडीने समन्स पाठवले आहेत. राऊत यांना उद्या म्हणजेच २८ जून रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील ईडीच्या कार्यालयामध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे संजय राऊत यांनी मान कापली तरी गुवाहाटीला जाणार नसल्याचे ट्विट करत म्हटले आहे.
मला आताचा समजले ईडीने मला समन्स पाठवले आहे. छान… महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी..हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या..मला अटक करा! जय महाराष्ट्र! असे राऊत यांनी म्हटले आहे.