जळगावः प्रतिनिधी
येथील मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्यामंदिरात तब्बल 150 विद्यार्थ्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त मानवी साखळी बनवून महिला दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.
निस्वार्थपणे चोवीस तास सेवा देणारी स्त्री गृहिणी तिचे एक ममतामई रूप म्हणजे आई प्रत्येकासाठी अतिशय जिव्हाळ्याचा शब्द आई.महिला दिनानिमित्त स्त्रीच्या कार्याला देण्यासाठी मानव सेवा मंडळ संचलित प्राथमिक शाळेत 150 विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणात मानवी साखळी तयार करून आई हा शब्द साकारून सर्व महिलांना आगळ्या वेगळ्या पध्दतीने शुभेच्छा दिल्या.