माझ्यासोबत ५० आमदार, आजच्या बैठकीत निर्णय घेऊ; एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले!

0
86

गुवाहाटी : वृत्तसंस्था

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असून आज गुवाहाटीमध्ये आमदारांसोबत एक महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत सरकार स्थापनेबाततच्या पुढील रणनिती आखण्यात येतील, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना शिंदे यांनी ही दावा केला आहे.
शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव हे देखील गुवाहाटीला पोहोचले असल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र, अद्याप भास्कर जाधव यांच्याशी संपर्क झाला नसल्याचं शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच, सध्या आम्हाला ५० आमदारांचा पाठिंबा असून त्यात ४०पेक्षा अधिक आमदार शिवसेनेचे आहेत. तर, इतर अपक्ष आमदार आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आज आमची बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाईल. राज्यपालांना पत्र द्यायचं की नाही याचा निर्णयही या बैठकीत घेतला जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
आमच्याकडे जवळपास ५० आमदार आहेत. जी काही मॅजिक फिगर लागते त्यापेक्षा जास्त आमदार आमच्याकडे आहेत. त्यामुळं पुढील रणनिती ठरवण्यासाठी आज बैठक होणार आहे. राज्यपालांना पत्र पाठवण्याबाबतही आजच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
आमदारकी रद्द करण्याची मागणी बेकायदेशीर आहे. पवारांच्या इशाऱ्याला आम्ही घाबरत नाहीत. लोकशाहीमध्ये असा दबाव काम करत नाही. कायद्याला आणि महत्त्व आहे. आमच्याकडे ५०पेक्षा जास्त आहे. एक नोटिस काय १० नोटिसा आल्या तरी भीक घालत नाही. तुम्ही मायनोरिटीमध्ये आहेत. त्यामुळं त्यांना नोटीस पाठवण्याचा काही अधिकार नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here