साईमत यावल प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळ्यानिमित्त राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियानाला दि .९ ऑगस्ट सुरुवात झाली त्यानिमित्ताने यावल नगरपरिषद कर्मचारी यांनी संपूर्ण यावल शहरात ठीक ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती केल्याने संपूर्ण यावल शहरात ‘माझी माती माझा देश’ घोषवाक्य मोठ्या आधाराने म्हटले जात आहे.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार शुक्रवार दि.११ ऑगस्ट रोजी सकाळी सकाळी ११ वाजता यावल नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी पंचप्रण शपथ तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. त्यात शहरात ठीक ठिकाणी पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. यावल नगरपरिषद प्रभारी मुख्याधिकारी हेमंत निकम, प्रशासक तथा प्रांताधिकारी कैलास कडलग् यांचे मार्गदर्शनाखाली नगरपरिषद स्थापत्य अभियंता योगेश मदने, विद्युत अभियंता पांडे, प्रभारी कार्यालय अधीक्षक एस. ए.शेख, प्रभारी आस्थापना लिपिक रवी काटकर, विजय मराठे, बाबुलाल भोई, संतोष नन्वरे, मधू गजरे, रफिक शेख, नगरपालिका कर्मचारी यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सोहळा साजरा करण्याची जय्यत तयारी सुरू केली असून शहरात पथनाट्यातून जनजागृती केली.
या सोहळ्याच्या निमित्त शहरात ‘मिट्टी को नमन,वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर आयोजित ‘मेरी माटी – मेरा देश’ अर्थात ‘माझी माती – माझा देश’ या अभियानाची सुरुवात झाली.संपूर्ण राज्यासह देशात ग्रा.पं.तालुकास्तर, जिल्हास्तरावर विविध उपक्रम त्यानिमित्त आयोजित केले जात आहेत.देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
अधिकारी-कर्मचारी घेणार पंचप्रण शपथ लोकप्रतिनिधी, प्रशासन,लोकसहभाग अशा सर्वांचा सहभाग यामध्ये राहणार आहे.पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन,वीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच गाव, पंचायत,गट,शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिला फलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत.पहिल्या टप्प्यात दि. 09 ते 14 ऑगस्ट या कालावधीत ग्रामस्तरावर विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.