माजी मंत्री जानकर जळगावात सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी भेटीला

0
36

जळगाव : प्रतिनिधी
दि.20 रोजी माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांच्या कन्येच्या विवाहानिमित्त जामनेरात राज्यातील मंत्र्यांची मांदीयाळी आलेली होती.
या कार्यक्रमास माजीमंत्री महादेव जानकर यांनी सुध्दा विवाह समारंभास हजेरी लावलेली होती. यावेळी शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा क्षितीज फाऊंडेशनचे अध्यक्ष गजानन वंजारी यांच्या निवासस्थानी माजी मंत्री जानकर यांनी भेट दिली. यावेळी वंजारी कुटूंबियांतर्फे जानकरांचे औक्षण करून स्वागत केले. तसेच माजी मंत्री जानकर यांनी क्षितीज फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याची दखल घेवून कौतुकाची थाप यावेळी गजाननला दिली. या प्रसंगी माजी सैनिक किशोर ढाकने यांच्या हस्ते माजी मंत्री.माधवराव जानकर यांचे स्वागत करण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष समाधानभाऊ पाटील, राष्ट्रीय समाज पक्ष जळगाव महानगराध्यक्ष गणेश चितळे, राष्ट्रीय समाज पक्षाचे संतोष वंजारी, सागर तायडे, निखिल सानप, अविनाश पारधे, राहुल अहिरे, मयुर घुगे, हर्षल वाघ, आकाश घुगे, विशाल घुगे, महेश लाडवंजारी, मनोजकुमार पाटील, हेमंत सानप, निलेश घुगे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here