माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणजे जळगाव जिल्ह्याचे हृदय-अनिल महाजन

0
31

अमळनेर ः प्रतिनिधी 

राजकारणात पडझडही सुरूच असते. सत्तेचा अमर  पट्टा आयुष्यभर कोणीही बांधून येत नाही. पण जनतेच्या मनात निर्माण केलेले स्थान हे कायम असते. जळगाव जिल्हा म्हणजे हा खान्देशचा एक मुख्य पाया आहे. या जिल्ह्याने या देशाला व जगाला अनेक महापुरुष दिले आहे. उदाहरणार्थ बहिणाबाई चौधरी व बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे अशा थोर व्यक्तींची जडणघडणही जळगाव जिल्ह्यात झाली आहे. साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून जळगाव जिल्ह्याची ओळख आहे. राजकारण हे विकास कारणासाठी करावे. ही वृत्ती डोळ्यासमोर ठेवून गेले ४० वर्षे एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यात कार्य करत आहेत. ते सत्तेत असताना जळगावमधील अनेक मोठे प्रकल्प उदयास आले. देशात कुठेही जळगाव जिल्ह्याचे नाव निघाले असता सर्वात प्रथम एकनाथराव खडसे यांचे नाव सर्वांच्या तोंडावर असते.

 

जळगाव जिल्ह्याचे हृद्य असलेले एकनाथराव खडसे यांना गेल्या १० वर्षांपासून काही संकोचित विचार सरणीचे राजकीय नेते मंडळी पाठिमागून वार करून या जळगाव जिल्ह्याच्या हृदयाला इजा पोहोचवण्याचे काम करत आहे. यामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यचा विकास थांबला आहे. कारण दूरदृष्टी व्हिजन असलेला दुसरा नेता सध्यातरी जळगाव जिल्ह्यात नाही. आजही जनतेच्या मनात नाथाभाऊ बद्दलच स्थान कायम आहे. आणि योग्य वेळ आल्यावर एकनाथराव खडसे यांच्या राजकीय कारकिर्दीला कलाटणी मिळेल. पक्ष कोणताही असो पण लोकनेता म्हणून यांना मानणारा जळगाव जिल्हा आजही त्या दिशेने वाटचाल करणारा आहे. आगामी काळात जिल्ह्याच्या विकासासाठी नाथाभाऊ हे यशस्वी नेतृत्व ठरू शकते. संकोचित विचार सरणीचे राजकारण करणार्‍या व्यक्तींना जळगाव जिल्ह्याची जनता हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन ओबीसी नेते अनिल महाजन यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here