चोपडा (प्रतिनिधी)
जळगाव जिल्ह्यात कमालीची भूजल पातळी वाढण्याचा उच्चांक चोपडा तालुक्याने घेतला आहे.गेल्या काळात खालावलेली पाण्याची पातळी तालुक्यावासियांचे डोके दुखीचा प्रश्न निर्माण झालेला होता.त्यावर गांभीर्याने चाणक्य नीतीने दूरदूष्टी ठेवून माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे व कार्यसम्राट आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांनी जलसंवर्धनाची कामे प्रचंड वेगाने मोठ्या प्रमाणात केल्याने भूजल पातळी वाढण्याचे श्रेय सोनवणे दाम्पत्यास जाते. जिल्ह्यात उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाई समस्या गंभीर असल्याचे गांभीर्य ओळखून आपला मतदारसंघात पाणी समस्या सुटून परिसर सुजलाम सुफलाम कसा होईल यासाठी त्यांनी दंड थोपटले होते.. भूजल अधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी व भौगोलिक अभ्यास तज्ज्ञांच्या बैठकांवर बैठका लाऊन आवश्यक त्या ठिकाणी नियोजनबध्द आराखडा तयार करून जलसंवर्धनाची कामे हाती घेऊन प्रचंड कामे केली.
परिणामी आज जिल्ह्यांचा जाहीर झालेल्या भूजल पातळीचां आलेखात चोपडा नंबर वन आला आहे. हे सर्व काही शक्य झालं ते माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे यांच्या दूरदूष्टीने.त्याच्या काम करण्याच्या या अनोख्या पद्धतीला तोड नाही.बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले.. याप्रमाणे कार्य करणाऱ्या या महान लोकसेवकाचे विकास कार्या सोबत जनहिताचे सर्वच समस्यांवर कडी नजर ठेवून कोणतीही समस्या मार्गी लावण्याचे त्यांची धूर्त नीती अजब असल्याने जनतेतून बोलले जात आहे. त्यांच्या जनहिताचे योगदान बद्दल त्यांचेवर सदा सर्वदा अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून जळगाव जिल्ह्यात ६६ पाणलोट क्षेत्रात असलेल्या १७८ विहिरींच्या जलपातळीची नोंद भूजल सर्वेक्षणात घेतली जाते.गेल्या वर्षी पावसाळ्यात इतर तालुक्यात अधिक पाऊस झाला असताना चोपडा तालुक्यात कमी पाऊस झाला होता. तसेच भूजल सर्वेक्षणातही चोपडा तालुक्यात घट झाली होती.
• मात्र त्यानंतर माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी जातीने लक्ष घालून जलसंवर्धनाची कामे केल्याने सर्वेक्षणात चोपडा तालुक्यातच सर्वाधिक २.९२ मीटरने वाढ झाली आहे. ही भूजल पातळीत चांगलीच वाढ असल्याने चोपडा तालुक्यासाठी ही दिलासादायक बाब ठरली. आता उन्हाळ्यात होणारी भूजल मोजणी कशी राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.