मलकापूर सतीश ढांगे
स्थानिक पद्मश्री डॉ. व्ही. बी. कोलते इंजिनिअरिंग कॉलेज मलकापूर येथे महाविद्यालयातिल महिला उद्योजक कक्षामार्फत जनजागृती कार्यक्रम प्राचार्य डॉ. अनिल खर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातिल महिला उद्योजक कक्षाचे प्रेसिडेंट प्रा. तेजल खर्चे, अमरावती येथील एमएसएमई व स्टार्ट अप फोरम भारत च्या अध्यक्षा प्रगती तायडे तसेच महाविद्यालयातिल प्राध्यापिका मयुरी पाटील, संजीवनी वाडेकर, कोमल होले, ज्योती पाटील, स्नेहल पवार सह मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या.
महिलांसाठी औद्योगिक धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य ठरले आहे. या धोरणामागचा सरकारचा विचार म्हणजे एक महिला शिकली की कुटुंब शिकते हा जसा शाश्वत विचार आहे, त्याच धर्तीवर एक महिला उद्योजक झाली तर ती अनेक महिलांना रोजगार देऊ शकते. यासाठीच राज्य सरकारने सर्वप्रथम महिलांसाठी उद्योजक धोरण तयार केले आहे. यामध्ये एखाद्या महिलेस स्वतःचा उद्योग सुरू करायचा असेल तर, लागणाऱ्या भांडवलाचा काही भाग सरकार अनुदान रूपाने देते. त्याचप्रमाणे महिला उद्योजकांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांतून भाग घ्यावा यासाठी राज्य सरकार आर्थिक मदत करते याबाबतची माहिती महाविद्यालयातिल ‘महिला उद्योजक सेल’ च्या प्रेसिडेंट प्राध्यापिका तेजल खर्चे यांनी यावेळी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
उद्योगजगताचा विस्तार झपाट्याने होत आहे. आजकाल उद्योग क्षेत्राच्या गरजा वैशिष्ट्यपूर्ण असतात. कौशल्यापासून भांडवलापर्यंत आणि गुंतवणुकीपासून पायाभूत सुविधांपर्यंतच्या गरजा या स्पष्ट असतात. अशावेळी सर्वच उद्योगांना हाताशी धरून औद्योगिक विकास करण्यापेक्षा ज्या क्षेत्रांसाठी राज्यात संधी आहे. असे मत अमरावती च्या प्रगती तायडे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मयुरी पाटील यांनी केले.