यावल : प्रतिनीधी सुरेश पाटील
येथिल एस.टी.स्टँड आवारातील श्री काळभैरव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भुसावळ येथील बिल्डर्स मंदार चव्हाण यांच्या हस्ते फराळ व प्रसादाचे वाटप करण्यात आले.
महाशिवरात्रीनिमित्त श्री काळभैरव मंदिरात यावल शहरातील तरुण कार्यकर्त्यांनी सर्व स्तरातील नागरिकांसाठी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात यावल आगारातील अधिकारी-कर्मचारी, चालक वाहक कर्मचारी सेवानिवृत्त वाहक, चालक आदींनी सक्रिय सहभाग घेतला. महाशिवरात्री निमित्त प्रसादाचा लाभ हजारो स्री-पुरुष भाविकांनी घेतला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सागर पवार, सिद्धांत घारू, विलास चौधरी, दीपक मंदवाडे, गणेश चौधरी, चेतन सपकाळे, आकाश कोळी, संदीप माळी, लखन पवार, नकुल माळी, कार्तिक साळी, विकास पाटील, दिलीप फेगडे, विजय बारी आदिंनी परिश्रम घेतले.