महाराष्ट्र माळी समाज संघाच्या प्रदेश अध्यक्षपदी अनिल महाजनच

0
15

अमळनेर ः प्रतिनिधी
माळी समाजाची ३८ वर्ष सर्वात जुनी आणि अधिकृत संघटना ही महाराष्ट्र माळी समाज महासंघ आहे. १९८३ पासून हा महासंघ माळी समाजाच्या सामाजिक कार्यासाठी अस्तित्वात आहे. माळी समाजातील यशस्वी अनेक मान्यवरांना या महासंघात काम करण्याची संधी मिळाली आहे.
दि.१८ ऑक्टोंबर २०१८ रोजी नाशिक येथे लोकशाही पद्धतीने निवडणूक होऊन महाराष्ट्र माळी समाज महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली होती. संस्थेच्या सर्व अधिकृत सभासदांनी एकत्र येऊन एकूण ११ लोकांची विश्वस्त म्हणून निवड केली व नवीन विश्वस्त कार्यकारी मंडळ स्थापन करण्यात आले.
अनिल महाजन, हरिश्चंद्र डोके, आर.बी.माळी, प्रवीण महाजन, अशोक भुजबळ, दीपक महाजन, शोभा रासकर, पौर्णिमा महाजन,डॉ.विना कावलकर, अजय गायकवाड, काशिनाथ जाधव. विश्वस्तपदी निवड केली होती व सर्व नवनियुक्त विश्वस्त यांनी मिळून प्रदेश अध्यक्षपदी अनिल महाजन यांची निवड केली आहे. त्याचा अधिकृत चेंज रिपोर्ट २७ नोव्हेंबर२०१८ रोजी पुणे धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आला होता.
मागील विश्वस्त बॉडीमधील माधवराव हुडेकर ,विजयराव बोरावके,भानुदास राऊत व यांच्यासोबत अजून काही वयस्कर व खोचट मंडळींनी अनिल महाजन व नवीन विश्वस्त यांची निवड बेकायदेशीर आहे असा आरोप केला होता. त्याचे कारण हे होते की, महाराष्ट्र माळी समाज महासंघाकडून काम न करणार्‍या व रीतसर मुदत संपलेल्या या जुन्या लोकांना सभासदांच्या मागणी वरून मागील विश्वस्तांना सर्व पदावरून कमी करण्यात आले आहे. त्याचा राग मनात धरून व खुर्चीला चिकटूनच राहायचे नवीन लोकांना संधी द्यायची नाही ही वृत्ती मनात ठेवून काम करणार्‍या ह्या खोचट वयस्कर मंडळींनी बदल अर्ज मंजूर करण्यात येऊ नये म्हणून हरकत घेतली होती पण कितीही हरकत घेतली, खोटे-नाटे आरोप केले, समाजात संभ्रम निर्माण केले तरी सत्य हे कधीच लपत नसते.
मागील पाच वर्षांपासून आपला काम धंदा व्यवसाय सोडून पायाला भिंगरी बांधून स्वतःचा पैसा, वेळ खर्च करून महाराष्ट्रभर माळी समाज एकत्र करण्यासाठी फिरणारे अनिलभाऊ महाजन यांच्या कार्याची दखल अखेर पुणे धर्मादाय न्यायालयाने हरकतदारांचा अर्ज फेटाळला व अनिल महाजन यांच्यासह एकूण विश्वस्त असलेले १० लोकांचा बदल अर्ज गुणवत्तेच्या आधारावर मेरिट वर मंजूर करण्यात आला.धर्मादाय आयुक्त पुणे न्यायालयाचा आदेश राहुल चव्हाण यांच्या सहीनिशी पारित करण्यात आला आहे.अनिल महाजन यांच्यातर्फे ऍड. डी.डी.शहा यांनी काम पाहिले तर हरकतदार यांच्यातर्फे ऍड. टिळेकर यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here