जळगाव ः प्रतिनिधी
महाराणा प्रताप यांच्या जीवनकार्याचा अभ्यास करताना नवी स्फूर्ती मिळते. जाज्वल्य अशा ऐतिहासिक घटनांचे संदर्भ वाचताना राष्ट्रभक्तीचे स्फूरण चढते. लढवय्या राजा कसा असतो? याचे दर्शन आपल्याला होते, अशा शब्दांत शाळा, महाविद्यालये व संघटनांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मान्यवरांनी मत व्यक्त केले. प्रतिमापूजन, युद्ध कलेचा अभ्यास, वक्तृत्व स्पर्धा, शैक्षणिक साहित्य वाटप असे कार्यक्रम ही पार पडले.
शहरातील सूर्यवंशी कुशवाह राजपूत समाजातर्फे महाराणा प्रताप यांची जयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. कांचन नगरातील समाज भवन येथे क्रांतिसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे, शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बळीराम हिरे, नगरसेवक किशोर बाविस्कर, प्रतापसिंग राजपूत, करणी सेनेचे निलेशसिंह राजपूत, महेंद्रसिंग पाटील, दीपक राजपूत यांनी केले. कल्पेश राजपूत जितेंद्र राजपूत, दगडू राजपूत, देविदास राजपूत, रवींद्र राजपूत, लीलाधर राजपूत, जिगर राजपूत, दीपक राजपूत, किरण राजपूत, दीपक राजपूत, चंद्रकात राजपूत, अमोल राजपूत यांनी सहकार्य केले.
क्रांतीसूर्य महाराणा प्रतापसिंह बहुउद्देशीय संस्थेतर्फे पूजन
संस्थेतर्फे क्रांतीसूर्य महाराणा प्रताप यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. महापौर जयश्री महाजन, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, आमदार सुरेश भोळे, पुतळा समिती अध्यक्ष डॉ. जी. एन. पाटील, उपाध्यक्ष उदय पाटील, सचिव विनोद शिंदे, खजीनदार नंदनसिंग पाटील, संचालक उत्तमसिंग पाटील, चंद्रसिंग पाटील, एन. बी. पाटील, माजी माहिती आयुक्त रवींद्र जाधव, ॲड. देवेंद्रसिंग जाधव, चंदू पाटील, ॲड. शुचिता हाडा, अतुल हाडा, साहेबराव पाटील, महेंद्र पाटील, डॉ. सुरेश सूर्यवंशी, सतीश शिंदे, मंगलसिंग पाटील, पिंटू पाटील, नीलेश राजपूत, कृष्णा पाटील व इतर पदाधिकारी आदी उपस्थित होते.
युवा ब्रिगेडतर्फे अभिवादन
युवा ब्रिगेडतर्फे महाराणा प्रतापांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष यश पाटील यांनी प्रतिमा पूजन केले. जिल्हाध्यक्ष अनिकेत पाटील यांनी व्याख्यान दिले. अध्यक्ष डॉ. विजय पाटील, प्रदेशाध्यक्ष दीपक कोल्हे, सुमित भंगाळे, बादल राजपूत, सनी राजपूत, तेजस भारंबे, प्रशांत महाले, जयेश साहुंके, अनिकेत राजपूत उपस्थित होते.