महापौर महाजनांनी केले नरेंद्राशिष प्रिमिअर लिगचे उद्घाटन

0
38

जळगाव ः प्रतिनिधी

‘जळगाव टी-10 क्रिकेट असोसिएशन, जळगाव’ आयोजित नरेंद्राशिष जळगाव प्रिमिअर लिग लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेचा दि.18 रोजी महापौर जयश्री महाजन यांनी उद्घाटन केले.

प्रथम दिवशी नोमन्‌ क्लब चॅम्पियन्स , रेडियन्स रायडर्स , सागर भाऊ प्रोटेक्टर्स यांची सरशी तत्पूर्वी महापौर सौ.जयश्री महाजन यांनी केले. धावपट्टी पूजन, नाणेफेकीसह क्रिकेट खेळून उद्घाटन केले. याप्रसंगी नरेंद्रशिष जळगाव प्रीमियर लीग चे मुख्य प्रयोजक इंजि.राहुल सोनवणे तसेच उपमापौर कुलभूषन पाटील व सागर सोनवणे, सोबत प्रथम्‌ पारितोषिक देणारे दाते रोहित तलरेजा व द्वितीय पारितोषिक देणारे आशफाक शेख तसेच टी 10 चे सचिव पंकज महाजन, लिंगायत समाज अध्यक्ष संदीप लिंगायत वाणी, विवेक पाटील, सतनामसिंग बावरी यांच्यासह असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, क्रिकेटप्रेमी व क्रिकेट संघांतील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here