जळगाव ः प्रतिनिधी
पुणे येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे नुकत्याच झालेल्या सातव्या अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलनात जळगाव येथील कवयित्री पुष्पलता कोळी यांचा मानपत्र व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
संमेलन चित्रकाव्य, लेखन स्पर्धा, परिसंवाद काव्यमैफल व प्रकट मुलाखतीने रंगले. महाकाव्य संमेलनाध्यक्ष हास्यकवी अशोक नायगावकरांनी महाकाव्य संमेलनाने कवींच्या प्रतिभेला फुलण्याची संधी मिळते, असे प्रतिपादन केले. खान्देशच्या या कलावंतांची व कवी-कवयित्रींची कीर्ती सर्वदूर राहो असे नायगावकर म्हणाले. कवयित्री पुष्पलता कोळी यांनी महाकाव्य संमेलनामध्ये वृद्धाश्रम’ ही कविता सादर केली.
चित्रकाव्य स्पर्धेत कुल्फी’ही कविता सादर केली. त्याबद्दल कोळी यांना नायगावकरांच्या हस्ते सन्मानपत्र देण्यात आले. कवी निवृत्तीनाथ कोळी यांनीही आईआणि बाबा’ ही कविता सादर केली. त्यांचाही हास्यकवी अशोक नायगावकरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.