Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मसाप जळगाव शाखेची कार्यकारिणी घोषित
    जळगाव

    मसाप जळगाव शाखेची कार्यकारिणी घोषित

    saimat teamBy saimat teamApril 28, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी
    महाराष्ट्र साहित्य परिषद जळगाव शाखेची सर्वसाधारण ऑनलाईन सभा मंगळवारी डॉ. ए. पी. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्राचार्य डॉ.किसन पाटील व प्रा. भास्कर पाटील यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागा आणि एकूण नवीन कार्यकारिणी निवडण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.
    याप्रसंगी दोन्ही मान्यवर साहित्यिक व महाराष्ट्र साहित्य परिषदेचे क्रियाशील उपाध्यक्ष व कार्याध्यक्ष यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच महाराष्ट्रातील दिवंगत थोर साहित्यिक, समीक्षक, विचारवंत, कलावंत, प्राध्यापक, शिक्षकांनाही सभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.
    यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी परिषदेचे डॉ. किसन पाटील आणि प्रा. भास्कर पाटील यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याबद्दल मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. बी. एन. पाटील, डॉ. सत्यजित साळवे यांनी मार्गदर्शनपर सूचना केल्या. कार्यवाह डॉ. अशोक कौतिक कोळी यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील यांनी परिषदेच्या कार्याला उजाळा दिला.
    डॉ. ए. पी. चौधरी यांनी कार्यकारिणी जाहीर केली.ती अशी ः अध्यक्ष – प्राचार्य डॉ.शिरीष पाटील, उपाध्यक्ष – प्रभात चौधरी आणि डॉ. अशोक कौतिक कोळी, कार्याध्यक्ष – प्रा. डॉ. सत्यजित साळवे, सहकार्याध्यक्ष – नामदेव कोळी, कोषाध्यक्ष – युवराज माळी,कार्यवाह (स्थानिक) – डॉ. योगेश महाले, सहकार्यवाह (बहिस्थ)- प्रा.गोपींचद धनगर, सदस्य – सौ. माया दिलीप धुप्पड, शशिकांत हिंगोणेकर, संजीवकुमार सोनवणे, विजय सुपडू लुल्हे, मोरेश्‍वर सोनार अशी तेरा जणांची निवड केली.
    या निवडीला उपस्थित सभासदांनी टाळ्या वाजवून मान्यता दिली. सभेला प्राचार्य डॉ. पी. आर. चौधरी, प्राचार्य डॉ. वासुदेव वले, डॉ.सुनील मायी, डॉ. रविंद्र बावणे,डॉ. चंद्रमणी लभाणे यांच्यासह अनेक आजीव सभासद उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : जळगावात ऊसतोड कामगारांचा ठिय्या आंदोलन

    March 16, 2026

    Bhusawal : भुसावळच्या मध्यवर्ती भागातील कोट्यवधींची जागा कचऱ्याच्या विळख्यात

    March 16, 2026

    Jalgaon : जळगाव पोलिसांच्या गोपनीय माहितीतून मालेगाव टोळीचा पर्दाफाश

    March 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.