मलकापूर येथेनगरपरिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू 

0
23
मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर1/5/22 शासन स्तरावर व नगरपालिका प्रशासन संचालनालय स्तरावर राज्यातील नगरपालिका नगरपंचायती मधील कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्नांबाबत जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्यामुळे नगरपरिषदेचे संघटनेचे पदाधिकारी सर्व सदस्य कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेसह बेमुदत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. 10-20-30 वर्षांनंतर मिळणारे कालबद्ध आश्वासीत प्रगती योजना लागू करणे, 100 % वेतन कोषागारातून करणे, 7 व्या वेतन आयोगाच्या फरकाचे थकीत हप्ते मिळणे, शासनाकडून वेतनखर्चासाठी मिळणारे सहायक अनुदान मागणीपेक्षा कमी मिळत असून ते परिपूर्ण देण्यात यावे, कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन लागु करणे या व अशा एकुण 26 मागण्यांसाठी विविध संघटनांनी 2 वर्षांपासून पाठपुरावा करुनही योग्य तो प्रतिसाद न मिळाल्याने दि. 5 एप्रिल 2022 रोजी काळ्या फिती लावून काम करण्यात आले, तदनंतर दि. 20 एप्रिल 2022 रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन करण्यात आले पण तरीही शासनाने गांभीर्य न दाखवल्याने अंततः राज्यातील सर्व नगरपरिषद, नगरपंचायत मधिल कर्मचारी अत्यावश्यक सेवेसह बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. याठिकाणी मलकापूर मतदारसंघाचे आमदार राजेश एकडे, तहसीलदार तथा नगरपरिषद प्रशासक राजेश सुरडकर, मुख्याधिकारी रमेश ढगे, माजी नगराध्यक्ष हरिश रावळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश पाटील, यांनी भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here