Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»नाशिक»मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी नियोजनाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांचा गिरणा गौरव पुरस्काराने विशेष सन्मान
    नाशिक

    मराठी साहित्य संमेलनाच्या यशस्वी नियोजनाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांचा गिरणा गौरव पुरस्काराने विशेष सन्मान

    SaimatBy SaimatApril 8, 2022No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक:– एका नदीच्या नावाने गिरणा प्रतिष्ठान उभं राहते आणि अविरत २३ वर्ष काम करत आहे. ही अतिशय कौतुकास्पद बाब आहे. नदीच्या नावाने दिला जाणारा हा सन्मान त्या नदीचा सन्मान आहे. गिरणाकाठचे नाव महाराष्ट्रभर पोहचविण्याचे श्रेय खऱ्या अर्थाने गिरणा गौरव प्रतिष्ठाण या संस्थेला जाते. तसाच सन्मान नाशिक शहरातील गोदावरीचा देखील व्हावा यासाठी तिला स्वच्छ सुंदर ठेवणं आपली जबाबदारी असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

    नाशिक शहरातील महाकवी कालिदास कलामंदिर, गिरणा गौरव प्रतिष्ठाण नाशिक, आयोजित गिरणा गौरव पुरस्कार संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

    यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे, जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंह,पोलीस अधीक्षक सचिन पाटील ,नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे,, निर्माण ग्रुपचे नेमीचंद पोतदार, आनंद ऍग्रोचे उद्धव आहेर, ललित रुंगठा ग्रुपचे अभिषेक बुवा, ज्येष्ठ पत्रकार दिपक चव्हाण, प्रा.सोनवणे, गिरणा गौरवचे अध्यक्ष सुरेश पवार, भारत गोसावी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

    यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, लोककलांचा जागर करणारी संस्था म्हणजे गिरणा गौरव प्रतिष्ठान असून संस्थेच्या अध्यक्ष सुरेश पवार यांनी संस्थेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तीमत्व जोडली आहे. या माणसं जोड प्रकल्पातून निरंतर आशा व उमेद घेऊन हि संस्था अनेकांची ऊर्जा बनली. नाशिक प्रत्येक माणसाला आपलपण देणारी परिपूर्ण संस्था “हात नको मनं जोड़ा मनामनातल अंतर तोडा’ हे ब्रिद घेऊन माणुसपणाचा शोध घेणारी संस्था दोन पाऊल पुढे टाकुन माणुस हाच केंद्रबिंदू मानत गेल्या २३ वर्षांपासून माणस शोधत आहे. मेहनत आणि सामाजिक योगदान देऊन नैतिक मूल्य जपणारी माणसं अशा गुणवंत माणसांचा शोध घेणारी उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य गिरणा गौरव प्रतिष्ठान ही संस्था रौप्य महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा हि भावना मनात रुजवत गेल्या दोन दशकापासून मार्गक्रमण करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

    ते म्हणाले की,गेल्या २३ वर्षांत हजारो माणसे जोडणाऱ्या या संस्थेला सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकिय, कृषी, उद्योग, कला व क्रिडा आदी क्षेत्रात जाऊन माणुसपणाची चळवळ राबवली आहे. हात नको, मने जोडा हा संदेश देत रोजच्या धकाधकीत हक्काची म्हणावी अशी माणसेही जमविली आहेत. अश्रुंसाठी मन मोकळ करण्यासाठी हक्काचा खांदा मिळावा म्हणून गिरणा गौरव प्रतिष्ठानने ‘माणुस जोडा’ अभियान सुरू केलं असल्याचे त्यांनी सांगितले.

    ते म्हणाले की, माणसातील माणुसकी जपणाऱ्या गिरणा गौरव प्रतिष्ठाण या संस्थेने जी माणसे समाजाभिमुख काम करतात, प्रसिद्धीपासून दूर राहिलेल्या माणसांना, त्यांच्या कर्तृत्वाला लौकिक मिळावा, हा प्रामाणिक हेतू अंगी बाळगला आणि अशा कर्तृत्वान माणसांना बळ मिळावे, त्यांचे कौतुक व्हावे, त्यांच्या पाठीवरून शाबासकीची थाप देऊन त्यांना पुरस्काराच्या माध्यमातून त्यांच्या केलेल्या कार्याची पावती घ्यावी. नुसता हाच उद्देश नाही, तर गिरणा गौरव प्रतिष्ठानने जी माणसे जोडली ती समृध्दपणे जोपसली सुद्धा या जगात माणूस हाच खरा जीवन जगण्याचा मूळ पाया आहे. म्हणूनच गिरणा गौरव प्रतिष्ठानमधून आजही निरंतर माणुसकीचा झरा वाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Nashik:“खरात प्रकरण: मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाम इशारा दोषींना कोणतीही सूट नाही”

    March 22, 2026

    Nashik Mhada Scam : म्हाडा भूखंड घोटाळा; मनवानी कोठडीत, बिल्डर लॉबी थरथरली

    March 20, 2026

    Premium Petrol Price Today Updates : जागतिक तेल किंमती वाढल्यामुळे भारतात प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ; साध्या पेट्रोल व डिझेलवर परिणाम नाही

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.