ममता बॅनर्जी यांना सत्र न्यायालयाचा दिलासा

0
76

मुंबई : प्रतिनिधी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे. राष्ट्रगीत अवमान प्रकरणी त्यांच्याविरोधात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने समन्स जारी करुन कायदेशीर प्रकिया सुरु केली होती. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या प्रक्रियेला स्थगिती दिली आहे. याबाबत २५ मार्च रोजी पुढील कार्यवाही होईल. ममता बॅनर्जी यांच्यातर्फे माजी खासदार अँड मजीद मेमन यांनी बाजू मांडली.

एक डिसेंबर २०२१ रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांच्याकडून राष्ट्रगीत अवमान झाल्याची तक्रार भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून करण्यात आली होती. याबाबत ममता बॅनर्जी यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरु करण्याचा व त्यांना समन्स बजावण्याचा निर्णय महानगर दंडाधिकारी पी.आय.मोकाशी यांनी १ फेब्रुवारी २०२२ रोजी दिला होता. त्या निर्णयाला ममता बॅनर्जी यांच्यावतीने अँड मजीद मेमन यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. बॅनर्जी यांच्यावतीने मजीद मेमन यांच्यासोबत अँड झुल्फीकार मेमन, अँड वसीम पांगारकर, अँड सब्यॅसाची बॅनर्जी, अँड तपीश जैन, अँड मतीन कुरैशी, अँड अभिषेक गणेशन व अँड खलील गिरकर यांनी काम पाहिले.  मजीद मेमन यांनी केलेला युक्तीवाद

ममता बॅनर्जी या मुख्यमंत्री असल्याने त्यांना समन्स जारी करण्यापूर्वी आवश्यक ती सरकारी परवानगी घेण्यात आली नाही. या प्रकरणी नमूद केलेल्या कायद्यातील कलम ३ लागू होत नाही. ममता बॅनर्जी या शिवडी महानगर दंडाधिकारी यांच्या भौगोलिक कार्यकक्षेबाहेर असल्याने सीआरपीसी २०२ व २०४ कलमाचे उल्लंघन झाले आहे.  न्यायाधीश राहुल रोकडे यांनी हा युक्तीवाद ऐकल्यानंतर महानगर दंडाधिकारी यांच्या निर्णयाला स्थगिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here