मनुर खुर्द येथे देशी व गावठी दारू खुलेआम विक्री सरपंच स्वाती हाडपे चे पोलीस निरीक्षकांना निवेदन

0
72

बोदवड : प्रतिनिधी
तालुक्यातील मनुर खुर्द येथे देशी दारू गावठी दारू खुलेआम विक्री केली जात असल्या बाबत सबंधीतांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे सरपंच स्वाती हाडपे यांनी केली आहे.
सदर मागणीचे निवेदन बोदवड पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना देण्यात आले. यावेळी मनूर खुर्द च्या सरपंच स्वाती अमोल हाडपे, उपसरपंच गणेश सोनवणे , ग्रामपंचायत सदस्या इंदुबाई धनगर, गीता धनगर, सरला वांगेकर, शोभाबाई गावंडे, पोलीस पाटील नितीन पाटील , तुषार सोनवणे , अमृत हाडपे, माणिक बोरसे , नामदेव धनगर , पांडुरंग धनगर आणि अविनाश श्याम सुंदर पाटील आदींची उपस्थीती होती.
दरम्यान , सदर प्रकार एकट्या मनुर खुर्द मध्ये नसून बोदवड तालुक्यातील चार पाच गावे वगळली तर सर्व गावात देशी दारू व गावठी दारू, इंग्लिश दारू विकली जाते या बाबत कडक कारवाई करण्याची मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here