मनसे मेळाव्याकडे राज्याचे लक्ष

0
32

पुणेः प्रतिनिधी

पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्रात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वर्धापन दिन सोहळा संपन्न होणार आहे . मनसे अध्यक्ष राज ठाकरे  स्वतः येथे उपस्थित राहत राज्यभरातील मनसेच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६ वा वर्धापन दिन पुण्यात साजरा होत आहे. याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे राज ठाकरे कार्यकर्त्यांना आज काय संबोधून पुढील येणाऱ्या निवडणुकीची दिशा काय असणार आहे हे आज राज्यातील जनतेला पाहावयास मिळणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज मंगळवारपासून तीन दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. ‘मनसे’च्या वर्धापनदिनाचा मेळावा यंदा पहिल्यांदाच पुण्यात होणार आहे. मंगळवारी सकाळी राज ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत; तर सायंकाळी नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या बॅडमिंटन हॉल व पाण्याच्या टाकीचे उद्घाटन ते करतील. बुधवारी सकाळी ते पुण्यातील काही प्रतिष्ठित व्यक्तींसह चर्चा करणार आहेत. बुधवारी सायंकाळी पाच वाजता मनसेचा वर्धापन दिन मेळावा गणेश कला क्रीडा मंच येथे होईल. गुरुवारी सकाळी पिंपरी-चिंचवड येथील मनसेच्या कार्यालयाचे उद्घाटन करून राज ठाकरे मुंबईला रवाना होतील, अशी माहिती पक्षाचे नेते अनिल शिदोरे, राजेंद्र वागसकर, शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी दिली.
पुण्यात हजारो मनसेचे कार्यकर्ते दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज (दि. ९) साजरा होणारा १६ वा वर्धापनदिन सोहळा यंदा पुण्यात होणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असून, त्यासाठी नाशिकमधून दहा हजार कार्यकर्ते जाणार असल्याचा दावा मनसेच्या वतीने करण्यात आला आहे. मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, नाशिकसह प्रमुख महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या मेळाव्यास महत्त्व प्राप्त झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here