मुंबई : काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता. ‘प्रश्न विचारायला अक्कल लागते काय’ असे वक्तव्य महापालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर या वक्तव्यावरून भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. यालाच अनुसरून आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यावेळी संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलसमोरील वर्दळीच्या रस्त्यावर झेब्रा क्रॉसिंग दिसत नाहीत. त्यामुळे पायी चालणाऱ्यांचे हाल होत आहेत. याच मुद्द्यावरून संदीप देशपांडे यांनी ‘झेब्रा क्रॉसिंग नीट रंगवायला अक्कल लागते का?’ असा सवाल केला आहे. त्यांनी ट्विट करत एक कार्टूनदेखील शेअर केले आहे.
झेब्रा क्रॉसिंग नीट रंगवायला अक्कल लागते का?? pic.twitter.com/55ZXekEVsO
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 19, 2022
