मनसेकडून शिवसेनेला पाठिंबा ; कोकणात लागले बॅनर

0
44

रत्नागिरी :  खेड-दापोली चे आमदार योगेश कदम शिंदे गटात सामील झाल्यानंतर कोकणातल्या मनसेने शिवसेनेला पाठींबा देत बॅनरच्या माध्यमातून सूचक संदेश दिला आहे. ‘कोकणची भूमी निष्ठावंतांची, ठाकरे बँड वाचवा गद्दारांना ठोका, असे या बॅनरमध्ये लिहिण्यात आले आहे. रत्नागिरी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी हे बॅनर लावले आहे.

महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आता उघडउघड ठाकरे सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. आपल्या जवळ ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा ते वारंवार करत आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार धोक्यात आले आहे. सध्या एकनाथ शिंदे गुवाहाटीतील रेडिसन हॉटेलमध्ये शिवसनेच्या नेत्यांना घेऊन थांबले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here