मनपा आयुक्तांनी केली पेव्हींग

0
41


जळगाव : प्रतिनिधी

महानगरपालिकेने नुकतेच काँक्रीट टेस्टिंग करिता टेस्टिंग हॅमर हे उपकरण खरेदी केले असून त्याद्वारे काँक्रीट टेस्टिंगची गुणवत्ता तपासणी मक्तेदाराने महापालिका प्रशासनाकडे मागणी केलेल्या /सादर केलेल्या देयकानुसार करण्यात येत आहे
त्यानुसार काल रोजी सर्वे नं.118गणपती मंदिर ओपन स्पेसमध्ये केलेल्या पेविंग ब्लॉकच्या कामाची तसेच पिंप्राळा येथील गट नं 5/1,5/2 अष्टभुजा नगर ओपन स्पेसमध्ये केलेल्या पेविंग ब्लॉकच्या कामाची गुणवत्ता स्वतः आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी स्थळ निरीक्षण करून केली. यावेळी त्यांचे समवेत शहर अभियंता नरेंद्र जावळे तसेच संबंधित मक्तेदार,
प्रतिनिधी हे उपस्थित होते.
आयुक्तांच्या सक्त सूचना
यावेळी संबंधित शाखा अभियंता व मक्तेदार/ प्रतिनिधी यांना कामासंबंधी कुठलेही प्रकारचे कॉम्प्रमाईज कामात केले जाणार नाही.कामाची क्वालिटी व गुणवत्ताही वर्क ऑर्डरमध्ये नमूद केलेल्या स्पेसिफिकेशनप्रमाणे करावी लागेल. याबाबत काहीएक कॉम्प्रोमाईज त्यात होणार नाही व केले जाणार नाही, अशा सक्त सूचना करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here