साईमत भुसावळ प्रतिनिधी
येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाने केंद्रिय मूल्यमापन प्रकल्प यशस्वीरित्या राबविल्या बद्दल प्राचार्य डॉ राजू फालक यांना विद्यापीठाचा परीक्षा मूल्यमापन प्राचार्य कार्य गौरव पुरस्कार तसेच प्रा दीपक जैस्वार यांना परीक्षा मूल्यमापन उत्कृष्ट प्रकल्प समन्वयक सेवा गौरव पुरस्कार 11 ऑगस्ट रोजी विद्यापीठात माजी कुलगुरू डॉ आर एस माळी, कुलगुरू डॉ व्ही एल माहेश्वरी यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.
यावेळी राजेंद्र नानंवरे उद्योगपती अशोक जैन, प्र – कुलगुरू डॉ एस टी इंगळे कुलसचिव विनोद पाटील उपस्थित होते. पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.