भोरटेक येथे हिस्त्र प्राण्याच्या हल्ल्यात सहा शेळ्या ठार

0
18

प्रतिनिधी : आमीन पिंजारी
कजगाव ता.भडगाव येथुन जवळच असलेल्या भोरटेक येथील भिकन परभत महाजन यांच्या सहा शेळ्या हिंस्रप्राण्याच्या हल्ल्यात ठार झाल्या गेल्या पंधरा दिवसांपूर्वी घुसर्डी येथील शेतकऱ्यांच्या दहा शेळ्या व बारा मेंढ्या हिंस्रप्राण्याच्या हल्ल्यात ठार झाल्या होत्या पंधराच दिवसात झालेल्या हिंस्रप्राण्याच्या हल्ल्या मुळे शेतकरी व पशु मालका मध्ये घबराट पसरली आहे.
बाबत वृत्त की भोरटेक ता.भडगाव येथील शेतकरी भिकन परभत महाजन यांच्या कजगाव चाळीसगाव मार्गा च्या काहि अंतरावर असलेल्या शेतात दि.३१ च्या रात्री शेतात बांधलेल्या सहा शेळ्या हिंस्रप्राण्याच्या हल्ल्यात ठार झाल्या जागेवर तीन शेळ्याच गळा व पोट फाडलेले आहे अन्य तीन शेळ्या फरपटत नेल्या आहेत या मुळे पशुमालक चे मोठे नुकसान झाले आहे गेल्या पंचवीस दिवसांपूर्वी दि.४ मार्च च्या रात्री देखील तेथुन पाच सहा किलोमीटर अंतरावरील घुसर्डी येथील बाबुराव पिरा खैरनार यांच्या दहा शेळ्या बारा मेंढ्या हिंस्रप्राण्याच्या हल्ल्यात ठार झाल्या होत्या त्या अगोदर देखील संजय भास्कर थोरात यांच्या सहा शेळ्या हिंस्रप्राण्याच्या हल्ल्यात ठार झाल्या होत्या महिन्या भरात एका मागुन एक करत या भागात हिंस्रप्राण्याच्या हल्ल्यात आता पर्यंत चौतीस शेळ्या व मेंढ्या हिंस्रप्राण्याच्या हल्ल्यात ठार झाल्या आहेत गेल्या महिन्याभरा पासुन होत असलेल्या हिंस्रप्राण्याच्या हल्ल्या मुळे पशुधन मालक चिंताग्रस्त झाला आहे
हिंस्रप्राणी नेमका कोणता गेल्या महिन्याभरा पासुन हिंस्रप्राणी शेळ्या मेंढ्या सह काहि प्राण्यावर हल्ले चढवत या प्राण्यांचा जिव घेत असुन यात पशुधन मालकांचे मोठया प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे प्राण्यावर हल्ले चढवणारा हिंस्रप्राणी नेमका कोणता आहे याचा मात्र काहि खुलासा होत नसल्याने पशुधन मालक सह शेतकऱ्या सह ग्रामस्था मध्ये घबराट पसरली आहे हा हिंस्रप्राणी लांडगा की तडस कींवा हा बिबट्या नेमका कोणता प्राणी आहे हिच चर्चा सर्वत्र सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here