भडगाव प्रतिनिधी
कजगाव ता.भडगाव दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिये याचा प्रत्यय आला तो भोरटेक च्या बरड भागातील लंगडी भवानी मंदिर परिसरातील रहिवाशांना भंडारा उधळत भुरळ टाकत एकाच्या पस्तीस हजार च्या तीन बकऱ्या तर एकाचे दोन अडीच हजार रुपये रोख घेत अज्ञात भामट्यांनी पळ काढला सदर घटनेमुळे नागरिकांत घबराट पसरली आहे भोरटेक बु.ता.भडगाव येथील बरड भागातील लंगडी भवानी मंदिर परिसरात पाच ते सहा घर वजा झोपडे असुन पाच सहा कुटूंब येथे वास्तव्यास आहेत दि.१७ च्या सकाळी तीन अज्ञात भामटे विना नंबर प्लेट असलेल्या मोटरसायकल ने या विरळ वस्ती असलेल्या भागात आले नी आपण एका प्रसिध्द असलेल्या ,बाबा चे शिष्य असल्याचे सांगितले नी सरळ झोपडी मध्ये प्रवेश घेतला परिसरातील सर्वच रहिवासी हे एकमेकांचे नातेवाईक असल्याने सारेच या झोपडीत जमले नी या भामट्यांनी भविष्यवाणी कथन करण्यास सुरुवात केली लवकरच तुमच्या दारी चारचाकी वाहन येणार आहे वैगेरे अनेक भविष्यवाणी कथन करत मोठे आमिष भविष्यवाणी ने प्रकट केले या साठी तुम्हास अकरा हजार रुपये बाबांच्या शिष्याला दक्षिणा द्यावी लागेल करीता परिवारातील एक सदस्य पैसे आणण्यासाठी कजगाव पोहचले मात्र कजगाव येथे पैसे न मिळाल्याने ते चाळीसगाव पोहचले चाळीसगाव येथुन पैसे घेउन येतोय असला निरोप मोबाईल ने घरच्यांना दिला सदर ची चर्चा भामट्यांना कळली नी घाईघाईने साऱ्यांना पुजेत बसविले नी पुजा सुरू केली पुजा दरम्यान कपाळी भंडारा लावत भंडारा उधळला हातात काहि एक कंगन दिले नी साऱ्यांना भुरळ येण्यास सुरुवात झाली नी एका सदस्यांच्या खिशात असलेले पैसे काढण्यास सांगितले हे भामटे जस सांगत होते त्या प्रमाणे हे कुटुंब करत होते भुरळ मुळे खिशातील दोन ते अडीच हजार रुपये या भामट्यांनी काढत तेथुन हाकेच्या अंतरावर राहणारे आप्पा कोळी यांच्या शेड कडे आपला मोर्चा वळवला या ठिकाणी आप्पा कोळी त्यांची पत्नी मुलगा हे बसले होते शेड मध्ये प्रवेश करताच तुमचा मुलगा थोड्याच दिवसाचा साथीदार आहे मोठी दुर्घटना होणार आहे आम्ही बाबाचे शिष्य आहे आपण बाबांच्या शिष्याला दक्षिणा दिल्यास संकट टळेल असं सांगितल्या नंतर कोळी यांनी आमच्याकडे काहि नाहि करत टाळण्याचा प्रयत्न केला शेवटी या तिघांच्या हाती कंगन देत भंडारा उधळला नी कोळी परीवार ला देखील भुरळ येण्यास सुरुवात झाली मग हे भामटे जस सांगत गेले तसं हे कुटूंब करत गेले नी तीन बकऱ्या अंदाजे पस्तीस हजार रुपये किंमतीच्या या भामट्यांच्या हवाली करत हे कुटुंब भुरळ मध्ये शेडमधून सार उघड्या डोळ्यांनी पहात राहिले भामटे रोकड व तीन बकऱ्या घेऊन पसार झाले तीन ते चार तासानंतर या ग्रामस्थांची भुरळ उतरल्या नंतर आपल्या बकऱ्या कुठं गेल्या तिकडे आपल्या खिशातील पैसे कुठे गेले नी मग लक्षात आले आपण भामट्या कडुन लुटलो गेलो सदर घटनेची चर्चा गावात व परिसरात होताच नागरिकांत घबराट पसरली आहे.
