भैरवी वाघ-पलांडे यांचे पक्ष संघटनेत ‘प्रमोशन’

0
32

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी जिल्हा दूध संघाच्या माजी संचालिका भैरवी वाघ-पलांडे यांची कामाची पावती म्हणून बढती करत प्रदेश उपाध्यक्षपदी निवड केली आहे. या माध्यमातून त्यांना ‘प्रमोशन’ मिळाले आहे.

आर्किटेक्ट भैरवी वाघ-पलांडे यांनी महाविद्यालयीन काळात जळगाव येथे अभाविपच्या माध्यमातून शैक्षणिक चळवळीत सक्रीय सहभाग घेतला आहे. भारतीय जनता युवा मोर्चामधील महत्त्वपूर्ण कार्यामुळे त्यांच्याकडे पुणे महानगर उपाध्यक्षपदाची जबाबदारी होती. त्यानंतर त्यांच्यावर प्रदेश सचिव म्हणून जवाबदारी देण्यात आली होती. पक्ष संघटनेत त्यांची कारकीर्द अधिकच उज्ज्वल राहिल्याने त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्ष म्हणून मोठी जवाबदारी देण्यात आली आहे. भैरवी या माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष स्मिता वाघ आणि स्व.उदय वाघ यांच्या कन्या असून पुणे येथील जयश्री आणि ॲड. अशोकराव पलांडे यांच्या स्नूषा आहेत. भैरवी अपूर्व पलांडे यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here